10 रुपयांना मिळतील 4 एलईडी बल्ब; जाणून घ्या सरकारी योजना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लि. (ईईएसएल) गेल्या काही काळापासून ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता गावातील वीज वाचविण्याच्या उद्देशाने व वीज बिल कमी करण्यासाठी नवीन योजना सुरू करणार आहे.

* अशी आहे योजना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी म्हटले आहे की, योजनेंतर्गत खेड्यांमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी 10 रुपयांत 3 ते 4 एलईडी बल्ब दिले जातील.

देशभरातील सुमारे 15 कोटी ग्रामीण कुटुंबांमध्ये एलईडी बल्बचे वितरण केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. ऊर्जा मंत्रालयांतर्गत एनटीपीसी, पीएफसी,

आरईसी आणि पॉवरग्रीडची संयुक्त उद्यम कंपनी ईईएसएलची ही योजना सुमारे 50 कोटी एलईडी बल्बचे वितरण करेल. यामुळे 12,000 मेगावॅट विजेची बचत होईल, तर कार्बन उत्सर्जन वर्षाकाठी 50 दशलक्ष टनांनी कमी होईल.

* यापूर्वीही चालविली होती ही योजना ईईएसएलने उजाला कार्यक्रमांतर्गत प्रति बल्ब 70 रुपये दराने यापूर्वी 36 कोटीहून अधिक एलईडी बल्बचे वितरण केले आहे,

परंतु यापैकी फक्त 20 टक्के बल्ब ग्रामीण भागात वितरित करण्यात आले आहेत. कुमार यांनी पीटीआयला सांगितले की आम्ही लवकरच ग्रामीण उजाला कार्यक्रम सुरू करणार आहोत.

अद्याप त्याच्या डिझाइनचे काम चालू आहे. त्याअंतर्गत गावात प्रति कुटूंब दहा रुपयांत तीन ते चार एलईडी बल्ब वाटप केले जातील. ही योजना येत्या तीन ते सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने देशातील सर्व खेड्यांमध्ये राबविली जाईल.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment