प्रियकरासाठी सासर सोडून आली माहेरी,पण लग्न करण्यास प्रियकराने दिला नकार अखेर प्रेयसीने केली आत्महत्या !

Ahmednagarlive24
Published:

जामखेड – प्रियकरासाठी सासर सोडून माहेरी आलेल्या विवाहित महिलेसोबत लग्न करण्यास प्रियकराने नकार दिल्याने अखेर संबंधित विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान या प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर सुरेश डोके याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहिणी बळीराम सदाफुले (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, रोहिणी हिचे गावातील सागर डोके याच्याशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते; मात्र, रोहिणीचे रीतसर लग्न होऊन ती सासरी नांदायला गेली होती.

तरीदेखील दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते. आरोपी याने मृत मुलीस लग्न करतो, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे रोहिणी आपल्या नव- याला सोडून माहेरी भुतवडा येथे राहण्यासाठी आली होती.

शनिवारी (१३ जुलै) दुपारी गावात भंडायचा कार्यक्रम होता. या वेळी सागर रोहिणीला भेटण्यासाठी आला होता. या वेळी तिने सागरला, ‘आपण लग्न कधी करायचे’, असे विचारले असता

सागरने, ‘मी लग्न करणार नाही’, असे सांगितले आणि तेथून निघून गेला. त्यामुळे त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास रोहिणी हिने आपल्या राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

यानंतर तिचा भाऊ किरण बळीराम सदाफुले याने आपल्या बहिणीच्या आत्महत्येस आरोपी सागर डोके हाच कारणीभुत असल्याचा आरोप केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment