अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंप्री येथे अनैतिक संबंधाच्या रागातून नरेंद्र सयाजी वाबळे (वय ४५)याची राजेंद्र बबन शिरवळे याने कुºहाडीने घाव घालून हत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास म्हातारपिंपरी शिवारात घडली.
म्हातारप्रिंप्री येथील राजू बबन शिरवाळे (वय ४२) याने पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालत उसाच्या शेतात त्याला सोमवारी ठार मारले. नंतर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर होऊन त्याने खून केल्याची कबुली दिली.
रात्री उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. राजू शिरवाळे हा हमाली काम करून उपजीविका करत असे. लाॅकडाऊनच्या काळात काम नसल्याने तो घरीच होता.
पत्नीचे गावातील नरेंद्र सयाजीराव वाबळे (वय ५०) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. काही महिन्यांपूर्वी वाबळे व पत्नीस त्याने रंगेहात पकडले होते.
या दोघांना त्याने समजदेखील दिली होती. वाबळेचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची खात्री झाल्याने शिरवाळे संतापला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास तो वाबळे याला उसाच्या शेतात घेऊन गेला.
कुऱ्हाडीने वाबळे याच्या तोंडावर सपासप वार करून त्याचा जागीच खून केला. नंतर शिरवाळे पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
अनैतिक संबंधातून खून केल्याचे त्याने सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा