अहमदनगर ब्रेकिंग : उपनगराध्यक्षाच्या बंगल्याशेजारी कोरोनाचा संशयित रुग्णाचा मृत्यू!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- आज संगमनेर तालुक्यात पुन्हा एका 48 वर्षीय कोरोनाच्या संशियताची मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

परंतु सदर व्यक्तीचा कोविड आरटीपीसीआर अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोरोना संशयित असल्याने त्याची नोंद कोरोनाबधितांच्या यादीत झालेली नसून संशयित म्हणून घेतलेली आहे.

ही व्यक्ती विद्यानगर येथील असून मॅकिनिकलचा व्यवसाय असल्याने कोण-कोण त्यांच्या संपर्कात आले आहे. याचा शोध घेणे आता सुरु केले असून ते प्रशासनापुढे फर मोठे आव्हान आहे.

कोरोनासंशयित व्यक्ती विद्यमान उपनगराध्यक्ष यांच्या परिसरातीलच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे.

एकीकडे तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. चार दिवसात तब्बल 87 रुग्ण तालुक्यात आढळून आले आहे.

त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोनाबधितांचा आकडा 389 वर जाऊन पोहचला आहे. पण, कोरोनाग्रस्तांच्या संख्येबरोबरच दिवसागणिक कोरोनाबाधीत होऊन मयत होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment