अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- प्रतिजेजुरी म्हणून ओळख असलेल्या पिंपळगावरोठा येथील कोरठण खंडोबा मंदिर परिसरात पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या खंडोबा व म्हाळसा यांच्या घोड्यावर स्वार असलेल्या मूर्तीसमोरील ४०० ग्रॅमच्या चांदीच्या पादुकांची सोमवारी पहाटे चोरी झाली.
मूळ मंदिरातील मूर्ती, पादुका व इतर वस्तू मात्र सुरक्षित आहेत. सोमवती अमावास्येनिमित्त कोरठण गडावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे भाविकांची गर्दी नव्हती.
शासनाच्या आदेशानुसार गेल्या १७ मार्चपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे. पुजारी देविदास एकनाथ क्षीरसागर व दत्तात्रय सुभाष क्षीरसागर तीन वेळा नित्य पूजाअर्चा करतात.
२० जुलैला सायंकाळी पाचला भाऊसाहेब यशवंत पुंडे हे परिसरात फिरत असताना भक्तनिवासाच्या तीन खोल्यांचे कोयंडे तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले.
विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांना ही माहिती दिली. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. गायकवाड यांनी यासंदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा