अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत बाधितांच्या संख्येत ७० ने वाढ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९२५ इतकी झाली असून

एकूण रुग्ण संख्या २२६२ इतकी झाली आहे. दरम्यान, आज ५८:रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२९१ इतकी झाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये आढळून आलेल्या ७० बाधित रुग्णामध्ये, संगमनेर तालुका २४, पारनेर तालुका ०१, श्रीगोंदा तालुका ०५, नगर शहर १३, नगर ग्रामीण २३, श्रीरामपूर ०३, राहुरी ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे

  • उपचार सुरू असलेले रुग्ण:९२५
  • बरे झालेले रुग्ण: १२९१
  • मृत्यू: ४६
  • एकूण रुग्ण संख्या:२२६२

    (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment