श्रीगोंदे :- जमिनीच्या वादातून उक्कडगावात राहणाऱ्या मागासवर्गीय महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील फिर्यादीला आरोपींनी पोलिसांसमोर मारहाण करून खोटा गुन्हा मंगळवारी दाखल केला,
अशी माहिती मिळाली. संबंधित कुटुंब मोलमजुरी व शेती करून उपजीविका करते. त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. दादा गोलांडे हा दमदाटी करून हे शेत आमचे आहे, असे म्हणून शिवीगाळ करत असे.
१५ जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी शेतातून पाणी आणण्यासाठी जात असताना भाऊसाहेब गोरख गोलांडे याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यांची झटापट झाली.
आरोपीने महिलेस धक्काबुक्की व जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
१६ जुलैला सकाळी ८ च्या सुमारास फिर्यादीच्या पतीस गोरख गोलांडे, राजू गोलांडे, भाऊसाहेब गोलांडे यांनी मारहाण केली.
महिला पतीस सोडवण्यासाठी गेली असता भाऊसाहेब गोलांडेने मिरची पावडर तिच्या डोळ्यात टाकली आणि खाली पाडून मारहाण केली.
पतीचे हातपाय बांधून राजीव गोलांडे व भाऊसाहेब गलांडे यांनी पिकअपमध्ये टाकून मारहाण करत बेलवंडी पोलिस ठाण्यासमोर आणून पोलिसांसमोरही मारहाण केली.
पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला. पीडिताला मारहाण झाली असताना पोलिसांनी उलट फिर्यादीलाच अटक केली.
- शक्तीपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार! दोन महिन्यात मोजणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
- FasTag Rules Change : फास्टॅग नियमांमध्ये १ एप्रिल २०२५ पासून बदल !
- Solapur Pune Highway : सोलापूर ते पुणे महामार्ग होणार सहापदरी ! तीन उड्डाणपूल
- गुगलचा वापर करताना जरा सावधान! गुगलवर घ्याल ‘या’ गोष्टींचा शोध तर खावी लागेल तुरुंगाची हवा; जाणून घ्या माहिती
- FasTag Rules 2025 : फास्टॅग नियमांमध्ये झाले मोठे बदल ! वाहतूक कोंडी…