अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- आषाढ महिन्यात काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने श्रावणात दमदार हजेरी लावली आहे. आज नगर शहरासह परिसरा चार वाजण्याच्या सुमारास दमदार पाऊस बरसला.
या पावसाने नगर शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. मंगळवारी रात्री नगर तालुक्यातील चिचोंडीपाटील, आठवड, सारोळा परिसर, संगमनेर तालुक्यातील घारगाव, बोटा येथे मंगळवारी रात्री चांगला पाऊस झाला.
दरम्यान, बुधवारी नगर शहरात चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा