अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 : मिरजगाव शहरात कोरोनाचा अखेरीस शिरकाव झाला असून येथील बगाडे गल्लीमधील ५० वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे.
या रूग्णाला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर आणखीन एका संशयित रूग्णाचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याची माहिती, मिरजगाव जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.हरीष दराडे यांनी दिली आहे.
आज आठवडे बाजार दिवशी एक दिवसाचे लाॅकडाऊन केले असताना लाॅकडाऊनच्या पूर्वसंध्येलाच मिरजगाव शहरात एक रुग्ण पाॅझिटीव्ह निघाल्याने मोठी खळबळ माजली आहे.
मिरजगाव शहरात कोरोनाची पहीले रुग्ण सापडल्याने मिरजगाव ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण शहरात दि.२३ ते दि.३० जुलै पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
या आठ दिवसाच्या कालावधीत शहरात (औषधे दुकान) वगळता पूर्ण व्यवहार बंद राहणार असल्याने जनता कर्फ्यू कालावधीत कोणीही विना कामाचे बाहेर फिरु नये
अन्यथा कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी दक्षता घेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा