अहमदनगर :- उच्चशिक्षित तरुणीच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे तिची बदनामी करणारा व दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर गजाआड झाला.
आकाश शरद सोनटक्के (सातारा) असे त्याचे नाव आहे. तरुणीच्या अकाउंटद्वारे तो तिच्या भावाला मेसेज करत होता. तुझ्या बहिणीचे लग्न दुसऱ्याशी कसे होते ते पाहतोच, ज्या मुलाशी लग्न करेल त्याला मी ठार मारेल, अशा धमक्या आरोपी फेक अकाउंटवरून तरुणीच्या भावाला देत होता.
याप्रकरणी २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपी तांत्रिक बाबतीत चतूर असल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक वैभव महांगरे, प्रतीक कोळी आदींनी ही कामगिरी केली.
- प्रवरेतील दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले पाथरे गावात प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांची भेट
- कोरठण खंडोबा गडावर उसळला जनसागर
- २ हजार ९०० चा पहिला हप्ता वर्ग ओंकार कारखान्यातर्फे प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा बाजारभाव
- पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…
- विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..