अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : गेल्या चार दिवसांपूर्वी भाळवणी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या घरातील व्यक्तींचे स्त्राव तपासणी करण्यात आले. त्यातील मृताच्या पत्नीला व भावाला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले.
बुधवारी दुपारी या दोघांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आढळल्याने भाळवणीत खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात भाळवणी येथील जिल्हा परिषद कर्मचारी पॉझिटीव्ह आल्यानंतर
त्याच्या संपर्कात आलेल्या ग्रामपंचायतीचे पाच कर्मचारी व इतर तीन जण असे आठ जण येथील प्राथमिक शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील एक कर्मचारी संशयित म्हणून तपासणीसाठीपाठविण्यात आला.
त्यावेळी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. परंतु या सर्व कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यात आल्यानंतर दोनच दिवसांत ‘त्या’ कर्मचाऱ्याला त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले.
परंतु त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. संशयित रुग्ण म्हणून उपचार घेत असताना त्या कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी होणे गरजेचे होते. परंतु तसे न होता त्या कर्मचाऱ्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
परंतू त्याचा अंत्यविधी झाल्यानंतर तीनच दिवसांत ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या घरातील दोन व्यक्ती पाॅझिटीव्ह आढळल्याने भाळवणीकरांची धाकधूक वाढली आहे.
अंत्यविधीच्या वेळी व त्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांच्या तपासणीची गरज निर्माण झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा