अहमदनगर ब्रेकिंग : 12वीत कमी मार्क मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : बारावीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी दहावी मध्ये 91 टक्के मार्क मिळाले.

मात्र बारावी मध्ये अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्यामुळे आज सकाळी विजय उर्फ महेश तुकाराम राऊत या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहिणी तोरडमल या करत आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment