अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांचे उत्पन्न वाढवून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. सद्य परिस्थितीत विविध ठिकाणी पैसे अडकल्याने शेतकरीही संकटात आला आहे.
त्यामुळे शेती करण्यासाठी आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. शेतकऱ्यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून किसान क्रेडिट कार्डअंतर्गत योज़ना आखल्या आहेत. आता या अंतर्गतच पशुपालक क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेतही शेतक्यांना अत्यल्प व्याजदराने कर्ज दिले जात आहे.
1 लाख 60 हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. आता हे मिळणारे कर्ज फक्त दुधाळ पशुधन, कुक्कुटपालन, शेळी, मेंढी आणि मत्स्यपालनासाठी मिळणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांना तालुका पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे एक पानाचा अर्ज करायचा आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना हे कर्ज तत्काळ मिळणार आहे.
बिगरहमी कर्ज हे कर्ज पशुसंवर्धनास चालना देण्यासाठी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकर्यांना मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मेंढी आणि शेळीपालनासाठी कर्ज दिले जाते. या योजनेंतर्गत 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना 50 आणि टक्के अनुदान योजनेसाठी प्राथमिक भागभांडवल किसान क्रेडीट कार्डद्वारे मिळणार असून ,
100 टक्के सवलतीमध्ये पशुपालन व्यवसाय सुरू करणे शक्य होणार असल्याची माहिती अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.
असे मिळवा कर्ज या कर्जासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सात बारा उताऱ्यासह वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती, पशुधनाची संख्या आदी माहितीचा एक पानी अर्ज पंचायत समितीमधील तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे सादर करावयाचा आहे.
या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना 50 आणि 75 टक्के अनुदानाच्या योजनेसाठी प्राथमिक भागभांडवल किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणार असून,
100 टक्के सवलतीमध्ये पशुपालन व्यवसाय सुरू करणे शक्य होणार असल्याची माहिती अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा