अहमदनगर : जामखेडमध्ये अजब प्रकार घडला. चक्क आरोपीने विवाहीत महिलेला लग्न करण्याचा आग्रह धरला. नवऱ्याला सोडून दे अन् माझ्याशी लग्न कर अशी अजब मागणी करत आरोपीने त्या महिलेच्या पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी मायकल शेळके (रा. लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) याच्या विरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात १६ जुलैला गुन्हा दाखल झाला आहे.
२५ जुन २०१९ रोजी फिर्यादी या त्यांच्या घरी असताना तेथे मायकल शेळके हा आरोपी आला. तु तुझ्या नवऱ्याला सोडून दे व माझ्याशी लग्न कर असे म्हणत आरोपीने शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच मारहाणही केली.
फिर्यादीच्या पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. आरोपीने फिर्यादीच्या घरातील आधार कार्ड, शाळेचा दाखला व इतर कागदपत्रे घेऊन पोबारा केला.
हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला सोडणार नाही. तुझा काटा काढीन अशा प्रकारची धमकीही आरोपीने दिली.
- …….तर वाहन चालकांना कोणत्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल मिळणार नाही ! महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय काय ?
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात ‘या’ तारखेपासून परतीचा मान्सून सुरु होणार
- देशातील टॉप 10 लॉ कॉलेजची यादी जाहीर! मुंबई, पुण्यातील महाविद्यालयांचा कितवा नंबर ?
- लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 344 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता, खात्यात कधी जमा होणार ?
- राजधानी दिल्लीहून ‘या’ तीन शहरांसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ! दिवाळीच्या आधीच प्रवाशांना मिळणार भेट, महाराष्ट्राला मान मिळणार का ?