राहुरी : ४० वर्षांच्या सामाजिक प्रश्नाची सुवर्णसंधी समजून शासनाने आजतागायत जिल्हा विभाजन केले नाही. अद्यापपावेतो स्पष्ट भूमिका न घेतल्याने जिल्हा विभाजन होणार किंवा नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी तरी जिल्हा विभाजन करा. अन्यथा आगामी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करून थेट सहभाग नोंदवू, असा इशारा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
लांडगे म्हणाले, जसं जिल्हा विभाजन न करण्याचं त्यांचं ठरलंय, तसं नाईलाजास्तव आमचंही आगामी प्रत्येक निवडणुकात उमेदवार उभे करण्याचं ठरलंय, अशी सडेतोड भूमिका आम्ही घेत आहोत. आमचाही मास्टर प्लॅन तयार असून तो योग्यवेळी जाहीरही करू.
मात्र, दिलेले उमेदवार हे श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या विचाराला समर्थन देऊन राजकारण करण्याच्या पलिकडे जाऊन निश्िचतच सर्वांगीण विकास करणारे असतील.
जिल्हा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह महसूलमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा दिलेली आश्वासने आणि दिलेले शब्द आजतागायत पाळले नाहीत.
त्यामुळे जिल्हाभर नाराजीचे सूर निघू लागले असून सर्वसामान्य जनतेच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी मंत्री महोदयांबरोबर सर्वच आजी-माजी लोकप्रतिनिधींचा आदर करत संपूर्ण जिल्हाकांक्षींनी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीला वेळोवेळी लाखमोलाची साथ दिलेली आहे.
कृती समितीने गेले साडेचार वर्षात अतिशय अस्थिर वातावरणात देखील जिल्हा विभाजनप्रश्नी जनजागृतीचे दृष्टीने अनेक लोकाभिमुख जनआंदोलने यशस्वी केली. याच धर्तीवर संपूर्ण जिल्हावासियांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
म्हणूनच जिल्हा विभाजन मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, असे सकारात्मक वातावरण असताना देखील या सरकारच्या जाणीवपूर्वक नाकर्तेपणामुळे जिल्हा विभाजन होत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
शासनाने जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी जिल्हाकांक्षीचा अंत पाहू नये. आवर्ती-अनावर्ती खर्चाचा विचार करता सर्वात कमी खर्च श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी येणार आहे. निकषांच्या आधारावर श्रीरामपूर जिल्हा करण्याची योग्य वेळ आली आहे.
जिल्हा विभाजनप्रश्नी कृती समितीसह संपूर्ण जिल्हावासियांचा सरकारवर विश्वास होता. परंतु, योग्यवेळी विभाजन न झाल्याने जिल्हाभर सर्वत्र तीव्र नाराजीचे पडसाद उमटत आहेत. अशाही अस्थिर वातावरणात देखील आम्ही जनजागृतीच्या दृष्टीने फलक लवकरच लावणार आहोत.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तरी जिल्हा विभाजन करा; अन्यथा तुमचं जसं जिल्हा विभाजन न करण्याचं ठरलंय तसं नाईलाजास्तव आमचंही आगामी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचं ठरलंय, अशी सडेतोड भूमिका राजेंद्र लांडगे यांनी मांडली आहे.
- मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! MSRDC ने घेतला मोठा निर्णय
- फक्त 9 महिन्यात गुंतवणूकदार झाले श्रीमंत! ‘या’ 5 म्युच्युअल फंड्सनी दिला 15% परतावा…पैसा टाकावा का?
- ट्रेन तिकीट बुक करताय? मग ‘हे’ एक काम केलंत तर 100% कन्फर्म सीट मिळणार! बघा गुपित फंडा
- पतंजलीचे धमाकेदार क्रेडिट कार्ड लॉन्च! दर महिन्याला 5000 पर्यंत कॅशबॅक, खरेदी करताच पडेल पैशांचा पाऊस
- काळजी घ्या ! ‘या’ झाडांची केल्यास सापांना मिळणार आमंत्रण, वेळीच सावध व्हा











