अहमदनगर ब्रेकिंग : धाकट्या भावाकडून थोरल्याचा खून !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 : संगमनेर शहरातील सुकेवाडी रोड येथील माताडे मळ्यात घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली.

शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. साहेबराव अभंग याच्या पत्नीला त्याचा मोठा भाऊ किशोर अभंग नेहमी शिवीगाळ करत असे. या त्रासाला कंटाळून ती निघून गेली. या कारणावरून दोघा भावांचे बुधवारी भांडण झाले.

पत्नी निघून गेल्याच्या रागातून साहेबरावने घरातील भाजी कापण्याच्या सुरीने किशोरच्या छातीत वार करुन त्याला ठार केले. साहेबराव दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. वडील मनोहर काशिनाथ अभंग यांनी शहर फिर्याद दिली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe