आजपासून ‘असा’ असेल गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह

Published on -

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदीही घातली आहे.

या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 173 वर्षांची परंपरा असणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहाकडे भाविकांचे लक्ष लागले होते. हा सप्ताह सराला बेटावरच करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ह्या सप्ताहास आजपासून श्रीक्षेत्र सराला बेटावर प्रारंभ होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने पार पडत असलेल्या या सप्ताहाची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे.

काल गुरुवारी तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी सप्ताहस्थळी भेट देऊन आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना सप्ताह समितीला दिल्या आहेत.

या सप्ताहाला महाराज मंडळी, बेटावरील विद्यार्थी तसेच सप्ताह समितीचे सदस्य असा 50 जणांची उपस्थिती असणार आहे. आज सकाळी 10 वाजता प्रहरा मंडपात विना आणि भजन महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते होणार आहे.

अवघे दहा टाळकरी आलटून पालटून 24 तास अखंड भजन गाणार आहेत. दुपारी 1 ते 2 या वेळेत महंत रामगिरी महाराज बेटावरील व्यासपिठावरून प्रवचन देणार आहेत.

भाविकांना या सप्ताहाला उपस्थित राहता येणार नसले तरी त्यांना सोशल मीडिया, टिव्ही, वृत्तपत्र या माध्यमातून या सप्ताहाचा आस्वाद घेता येणार आहे.

प्रशासनाच्या सुचनेनुसार भाविक या सप्ताहास येऊ नयेत म्हणून श्रीरामपूरकडून बेटाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. चर खोदून तसेच पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.

सप्ताहाचे सरळ प्रक्षेपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक व्हायरल करून तसेच फेसबुकवर लाईव्ह करण्यात येणार आहे. याशिवाय सप्ताहाच्या प्रवचनाचे साधना या वाहिनीवर सायंकाळी 6 ते 7 या कालावधीत प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News