डॉक्टरच्या संपर्कातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोपरगाव शहरातील ५८ वर्षीय डॉक्टरच्या संपर्कातील साईनगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल तपासणी केलेल्या ३१ अहवालानुसार २० अहवाल प्राप्त झाले होते. त्यात तीन पॉझिटिव्ह तर १७ निगेटिव्ह आले होते. त्यापैकी ११ व डॉक्टरच्या संपर्कातील १३ असे २४ अहवाल प्रलंबित असून त्याती एकाला त्रास होऊ लागल्याने

त्याची रॅपिड डायग्नॉस्टिक किटद्वारे तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहरात गुरुवारी पुन्हा एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोपरगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे. याबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर म्हणाले, बुधवारचे प्रलंबित असलेले १

१ अहवाल व ५८ वर्षीय डॉक्टर यांच्या संपर्कातील १३ असे २४ अहवालाचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे. डॉक्टरच्या संपर्कातील एका ४० वर्षीय पुरुषाला अचानक त्रास सुरू झाल्यामुळे त्या रुग्णांची कोरोना टेस्ट रॅपिड डायग्णॉस्टिक किट द्वारे तपासणी केली असता त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe