अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगराध्यक्षांना कोरोनाची बाधा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासह शिर्डीत करोनाने शिरकाव केला असून शहरात करोनाची शतकाकडे वाटचाल होताना दिसून येत आहे. दरम्यान साईंच्या नगरीत माजी नगराध्यक्षांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला, त्यानंतर गेली चार महिने आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साईनगरीत औषधालाही करोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे शिर्डी शहरातील नागरिकांच्या मनातील भीती नष्ट झाली होती.

मागील पंधरा दिवसांपासून शहरात एक एक रुग्ण दररोज वाढत जात असून आता हा आकडा 80 च्या वरती जाऊन पोहोचला असून करोनाची शतकाकडे वाटचाल होताना दिसून येत आहे.

यामध्ये सर्वसाधारण नागरिकांसह राजकीय नेते मंडळी सुद्धा करोनाच्या विळख्यात सापडली आहे. शहरात आता बाधित लोकांबरोबर राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही करोनाची बाधा झाल्याने अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

दोन ज्येष्ठ नेत्यांना बाधा झाल्याचे वृत्त शहरात वार्‍यासारखे पसरताच त्यांच्या संपर्कातील कार्यकर्त्यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment