अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.
अहमनगर शहरात तर कोरोनाचे दररोज दोन अंकी रुग्ण सापडत आहेत. कोरोनाने शासकीय कार्यालयात आपला विळखा घालण्यास सुरवात केली आहे.
आता शहरातील भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आधी महानगर पालिका नंतर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आता भिंगार छावणी परिषदेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. भिंगार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
मागील रविवारी भिंगार छावणी परिषदेचे सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यामुळे पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात पवार यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा