‘ह्या’तालुक्यात जोरदार पाऊस; बाजरी, भुईमूग पिके झाली भूईसपाट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्यानंतर सोयाबीन बियाणांमध्ये झालेली फसवणूक, शेम्बडी गोगलगायीचे संकट आदी नैसर्गिक संकटांनी शेतकरी आणखी कोलमडला.

परंतु त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी संगमनेर तालुक्यातील घारगाव, अकलापूर, बोरबन, खंदरमाळ येथे मुसळधार पाऊस झाला.

या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.

अनेक ठिकाणी शेतीचे बांधही फुटले आहेत. अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ह्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

अनेक शेतकऱ्यांवर शेतातील उभे पीक सोडून द्यावे लागणार आहे. केलेला खर्च वाया जाऊन दुबार पेरणीचा खर्चही करावा लागणार आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा मोडले जाणार आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment