नगर – पुणे महामार्गावर स्वस्तिक चौक परिसरात असलेल्या ब्लू डायमंड मसाज सेंटरवर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला.
शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या मसाज सेंटरवर छापा टाकून एका महिला व पुरुषाला ताब्यात घेतले.
या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक मिटके यांना मिळाली होती.
त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. पोलिसांना मसाज सेंटरमध्ये एका महिलेसह पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत आढळले.
दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस उपअधीक्षक मिटके यांनी सांगितले.
- लॉटरीत मिळालेलं म्हाडाचे घर विक्रीबाबत नियम काय आहेत ? वाचा सविस्तर
- मुंबईहुन ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन !
- मुंबईकरांसाठी खुशखबर ! शहरात सुरू झाली ई – बाईक टॅक्सी सेवा, ‘या’ 3 कंपन्यांना मिळाले तात्पुरते परवाने, भाडे किती असणार?
- यात्रीगण कृपया ध्यान दे….! अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, मध्य रेल्वेची अधिसूचना निघाली
- नवीन व्यवसाय सुरू करायचाय ? मग 3 लाख रुपयांमध्ये मोबाईल दुकानाचा व्यवसाय सुरू करा, पहिल्या दिवसापासून होणार कमाई