अहमदनगर मध्ये शरद पवारांचे ‘असे’ झाले स्वागत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राज्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. राज्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात फिरत आहेत. 

वयाच्या ऐंशीव्या वर्षातही देशावरील महाराष्ट्र वरील संकटाला दोन हात करण्याचे काम आज पवार साहेब करत आहेत. त्यांना बघून तरुण पिढीमध्ये एक स्फूर्ती निर्माण होत आहे.

त्यांच्या या कामाला आमचा सलाम.त्यांचे समाजाबद्दल असलेले विचार आजच्या युवकांपुढे प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर असताना औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप ,शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी  शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना शुभेच्छा दिल्या व कोरोनाच्या काळात देशाला दिशा देणारा 80 वर्षाचा तरुण योद्धा असे फलक स्टेशन रोड वरती झळकत होते.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment