अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ तारखेला वाढदिवस होता. विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी राष्ट्रवादीतर्फे विविध उपक्रम राबविले जातात.
परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करूनच वाढदिवस साजरा करावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना बजावले होते.
परंतु त्यांचे कट्टर समर्थक पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले. त्यांनी मोठी गर्दी जमवत गरजूंना विविध वस्तूंचे वाटप करण्याचा चांगला उपक्रम त्यांनी घेतला असला
तरी त्यासाठी जमलेली गर्दी मात्र आता भीतीचे कारण ठरत आहे. येत्या २७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पारनेरमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे शिवसेनेने यापूर्वीच जाहीर केले आहे.
परंतु त्याआधीच आ. लंके यांनी हा कार्यक्रम आयोजित करत शक्ती प्रदर्शन करण्याची संधी साधून घेतली. यावेळी तालुक्यातील ६१ लाभार्थ्यांना सायकल, तिघांना झेरॉक्स मशीन, तीन लॅपटॉप, तीन शिलाई मशिन,
दोन रिक्षा अशा साहित्यांचे वाटप करण्यात आले. या त्यांच्या वाटप कार्यक्रमामुळे अनेकांच्या जीवनाला हातभार लागेल यात शंका नाही परंतु झालेली गर्दी नियम तोडणारी असल्याने त्याचीही चर्चा नागरिकांमध्ये ऐकावयास मिळत होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा