राहुरी तालुक्यात एका दिवसात वाढले इतके रुग्ण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत.

आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी तालुक्यात शनिवारी दिवसभरात 7 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले.

त्यामुळे तालुक्यात बाधितांची संख्या 65 झाली आहे. यापैकी 22 रुग्ण पूर्ण बरे झाले असून 43 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात देवळाली प्रवरात दोन, उंबरे येथे एक तर बारागाव नांदूरला चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. एकंदरीत सर्व रुग्णांपैकी केसापूर 4, पाथरे 1, सोनगांव 4, वांबोरी 4, तांदुळवाडी 2, म्हैसगांव 3, वरवंडी 6, राहुरी फॅक्टरी 10, देवळाली (शेटेवाड़ी) 1, देवळाली 4, कात्रड 4, वळण 1,

राहुरी शहर 9, तमनर आखाडा 1, गुहा 1, तांदुळनेर 1, बारागांव नांदुर 5, डिग्रस 1, उंबरे 3, असे बाधीत आढळून आले आहेत.

दरम्यान, अहमदनगरमध्ये ३ हजार ६८ रुग्णसंख्या झाली असून १ हजार ५३७ ऍक्टिव्ह रुग्ण असून १ हजार ४८० रुग्ण बरे झाले आहेत.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe