आता याला काय म्हणाव ?दीड लाखांचे दागिने घेवून नववधू झाली प्रियकरासोबत फरार,नंतर केले लग्न !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, घरातील तब्बल दीड लाखाचे दागिने घेऊन प्रियकरासोबत नववधूने धूम ठोकली आहे.

अंगावरील दीड लाखांचे दागिने चोरत प्रियकरासोबत धूम ठोकली आणि आळंदी येथे जाऊन त्या दोघांनी लग्न केले. ही फिर्याद श्रीगोंदा पोलिसात पतीने दिली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील बाबूर्डी गावातील ही घटना आहे. त्या पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वैष्णवी संदेश शिंदे व संदेश नंदकिशोर शिंदे (दोघे राहणार तरडोली, मोरगाव ता. बारामती जि. पुणे )यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी पतीने व्यथा मांडताना म्हटले आहे की, 25 जून रोजी त्याचा विवाह झाला. त्यावेळी बायकोच्या अंगावर 1 लाख 55 हजाराचे सोने चांदीचे दागिने घातले.

मात्र लग्नापूर्वीच वैष्णवी व नंदकिशोर या दोघांचे अफेअर होते. 11 जुलै रोजी पत्नी वैष्णवी ही तिच्या प्रियकरासोबत दागिने घेऊन पळून गेली.

शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. त्या दोघांनी 17 जुलै रोजी आळंदी येथे विवाह केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe