हातातोडांशी आलेले पीक गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात

Published on -

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा विवंचनेत सापडला आहे. कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे.

त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

तालुक्यातील मातुलठाण, नायगाव परिसरात शुक्रवारी रात्री वार्‍यासह ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे.

या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.

अनेक ठिकाणी शेतीचे बांधही फुटले आहेत. अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

तरी शासनाने पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करू लागले आहे. नैसर्गिक अपत्ती मुळे हातातोडांशी आलेले पीक गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तरी तातडीने पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe