७६० लिटर बनावट ताडी जप्त

Ahmednagarlive24
Published:

जामखेड: नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात तपनेश्वर गल्ली महादेव मंदिराजवळ नेवाळवाडी येथे राहणा-या आरोपीच्या घरात व गाडीमध्ये १०- २०लिटर नव्हे तर तब्बल ७६० लिटर मेसळीची ताडी पोलिसांनी पकडली.

या  ठिकाणाहून पोलिसांनी एक व्हॅगनर गाडी नं. एमएच ०४,  बीएस २४५३ हिच्यातही ताडी  पकडली.

याप्रकरणी पोको शाम सुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विरेशम अजुन कोरकोपला, वय ५०, रा. तपेश्वर गल्ली, जामखेड, कैलास शाह पवार, रा. तुसळंब, ता.पाटोदा, जि. बीड यादोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

ताडी, व्हॅगनर गाडी, ताडी मोजण्याचा काटा, गाळणी, बकेट, प्लॅस्टीक ड्र्म जप्त करण्यात आले. सपो नि चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. हेका गव्हाणे हे पुढील तपास करीत आहेत.

ताड़ी नशाकारक द्रव्य ज्यांच्या सेवनामुळे विषबाधा होईल व जिवीतास धोका होईल याची जाणीव असतानाही ताडी विक्री करताना आरोपी पकडले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment