अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-पारनेर तालुक्यातील खडकवाडी व मांडवे खुर्द रोडवरील घाटमाथ्यावर एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत चिमा महादेव चिकणे वय ४५ वर्ष राहणार खडकवाडी तालुका पारनेर यांनी खबर दिली आहे.

File Photo
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२६ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मांडवे खुर्द ते खडकवाडी रोडवर घाटमाथ्यावर एका वळणावर एक ३० ते ४० वर्ष वयाचे पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत पडलेले असून,
त्यास ठीक-ठिकाणी जंगली प्राण्यांने कुरतडले व खाल्ल्याचे दिसत असून, मयताचे खिशात सापडलेल्या फोटोवरून मयताची ओळख पारनेर पोलिस पटवीत आहेत.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा