आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दी सारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत…

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- निवडणुकीच्या काळात युवाशक्तीशी संवाद साधण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दीसारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत.

ग्रामीण भाग समजून घेत दौरे करायला हवेत. कॉलेज जीवनाचा आनंद घेण्याच्या काळात आदित्य ठाकरे राजकारणात आला.

आता निवडणुकांची वेळ नसताना त्याने राज्यात फिरायला हवे, असा उपरोधिक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

थोरात यांच्या हस्ते रविवारी संगमनेरमध्ये दंडकारण्य अभियानास प्रारंभ झाला. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.

शिवसेना-भाजपच्या सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री आमचाच’ यावर भाष्य करताना थोरात म्हणाले,

गेली पाच वर्षे भांडण करताना एकमेकांचे गळे धरणारे आता एकमेकांच्या गळ्यात पडलेले दिसतात. त्यांचे हे नाटक असते.

सत्तेत कुणाला आणायचे हे ते नव्हे, जनता ठरवणार आहे. आदित्य यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यात दौरा सुरू केला. तो तरुण आहे. त्याने राज्यात फिरले पाहिजे.असे थोरात म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment