अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- सध्या मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ , त्याचे हल्ले या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. परंतु त्यामुळे जनजीवन दहशतीखाली वावरत आहे.
नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथेही बिबट्याचे हल्ले नित्याचे झाले आहेत. गुरुवारी रात्री एक गाय व वासरावर बिबट्याने हल्ला चढवला तर शेजारीच बांधलेल्या दुसर्या गाईने बिबट्यावर हल्ला चढवून त्याला पिटाळून लावले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महालक्ष्मी हिवरा येथील गट नंबर 71 मध्ये राहणारे सुभाष दिगंबर बोरुडे यांच्या वस्तीवर गाईच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या वासरू व गाईवर गुरुवारी रात्री दोन ते तीन वाजेदरम्यान बिबट्याने हल्ला चढवला.
मात्र याच गोठ्यात असलेल्या दुसर्या गाईने खुंटीचा दोर तोडून थेट बिबट्यावरच हल्ला चढवला गाईचे रौद्ररूप पाहून बिबट्याला आपला जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला.
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतावर काम करण्यासाठी देखील मजूर धजावत नाहीत. वनविभागाने तातडीने या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी या भागातील शेतकर्यांनी केली आहे.
-
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा