माजीमंत्री राधाकृष्ण विखेंनी ‘असे’ काही केले कि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- राज्‍य सरकाचे स्‍टेअरींग कोणाच्‍या हातात याची चर्चा जोरदार सुरु असतानाच इकडे शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्‍ठ असलेल्‍या संगमनेर तालुक्‍यातील जोर्वे आणि आश्‍वी जिल्‍हा परिषद गटामध्‍ये आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शास‍कीय योजनेतील लाभार्थ्‍यांना रिक्षांचे वितरण करुन लक्ष वेधून घेतले आहे. 

जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्‍यांना मिळावा यासाठी शिर्डी मतदार संघात आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या  मार्गदर्शनाखाली योजनांची अंमलबजावणी सातत्‍याने सुरु असते.

लोककल्‍याणकारी योजनांचा लाभ सामान्‍य माणसाला मिळवून देणारा शिर्डी मतदार संघ हा जिल्‍ह्यात यासाठी प्रथम क्रमांकावर ओळखला जातो.

समाज कल्‍याण विभागाच्‍या माध्‍यमातून सुशिक्षीत बेरोजगारांना बॅटरीवरील रिक्षा देण्‍यात येतात. यापुर्वीही मतदार संघात १५ लाभार्थ्‍यांना अशा रिक्षांचे वितरण करण्‍यात आले होते.

शिर्डी मतदार संघात संगमनेर तालुक्‍यातील समाविष्‍ठ असलेल्‍या गावांनाही योजनांचा लाभ आ.विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातून मिळत असतो.

समाज कल्‍याण विभागातून शंभर टक्‍के अनुदानावर मंजुर झालेल्‍या तीन रिक्षा अनुसुचित जाती जमातीतील योग्‍य व गरजू लाभार्थ्‍यांना उदरनिर्वाहासाठी देण्‍यात आल्‍या.

जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांचाही यासाठी पाठपुरावा होता. याप्रसंगी रिक्षांचे पुजन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील आणि सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍या हस्‍ते पुजन करुन लाभार्थ्‍यांना रिक्षा सुपूर्त करण्‍यात आल्‍या.

जिल्‍हा परिषद सदस्‍या अॅड.सौ.राहिणी निघुते, उपसरंपच गोकूळ दि‍घे, माजी सरपंच दिलीप इंगळे, सदस्य बाळासाहेब दिघे, संतोष बडकवाड आदि उपस्थित होते.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News