अखेर पाचपुते यांचा राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- श्रीगोंदे बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे मंगळवारी दिला.

अविश्वास ठरावासंदर्भात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली २९ जुलैला बैठक बोलवण्यात आली होती. अविश्वास ठराव संमत होणार अशी खात्री झाल्याने पाचपुते यांनी आधीच राजीनामा दिला.

राजीनामा मंजूर केल्याचे आहेर यांनी सांगितले. पाचपुते यांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. समितीचे नवीन सभापती व उपसभापती निवडीच्या तारखांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment