श्रीगोंदा :- शाळेसाठी निधी मागण्यास आलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद सह शिष्टमंडळास पालकमंत्री राम शिंदे यांनी नकार देत स्वताची जबाबदारी नाकारत चक्क दुसरा पर्याय सांगितला.
तालुक्यातील शेडगाव येथील शाळेतील वर्ग भरविण्या योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षणाचेधडे गिरविण्याची वेळ आली आहे.
इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध करून घ्यावा, या मागणीसाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना शेडगाव येथील एक शिष्टमंडळ भेटले.
त्यावर ना. शिंदे यांनी शाळा इमारतीसाठी निधी देण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाला मर्यादा येतात इमारत उभी करण्यासाठी तुम्ही राज्यसभा सदस्य किंवा विधानपरिषद सदस्यांकडे मागणी करा,
असा सल्ला देत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना भेटायला गेलेले शिष्टमंडळ अवाक् झाले.
शिवसंग्राम संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा दीपाली सय्यद- भोसले, सरपंच विजय शेंडे यांच्यासह एक शिष्टमंडळ पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना भेटले.
या शिष्टमंडळाने शाळेची झालेली दुरावस्था, विद्यार्थी उघड्यावर शिक्षण घेत असल्याबाबतचे वास्तव निदर्शनास आणून दिले.
आपण जिल्हा नियोजन समिती किंवा इतर योजनेच्या माध्यमातून शाळा इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
त्यावर ना. शिंदे यांनी आम्हाला शाळाच्या बाबतीत निधी उपलब्ध करून देताना मर्यादा येतात. तुम्हाला निधी उपलब्ध करायचाच असेल तर राज्यसभा किंवा विधान परिषद सदस्याकडे मागणी करा, असे सांगत स्वतः जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
दीपाली सय्यद म्हणाल्या, आज आम्ही फार मोठ्या अपेक्षेने पालकमंत्री शिंदे यांना भेटलो. त्यांना शेडगावच्या शाळेसोबतच संपूर्ण जिल्ह्यातील शाळांची काय अवस्था आहे,
हे निदर्शनास आणून दिले. मात्र, त्यांनी नकारात्मक भूमिका दाखवत शाळेच्या निधी उपलब्ध होण्याबाबत नकारघंटा वाजवली.
या भेटीत आमची निराशा झाली असली तरी आम्ही अन्य पर्यायसमोर ठेवून निधी उपलब्ध करून शाळा कशी उभी करायची यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
- FasTag Rules Change : फास्टॅग नियमांमध्ये १ एप्रिल २०२५ पासून बदल !
- Solapur Pune Highway : सोलापूर ते पुणे महामार्ग होणार सहापदरी ! तीन उड्डाणपूल
- गुगलचा वापर करताना जरा सावधान! गुगलवर घ्याल ‘या’ गोष्टींचा शोध तर खावी लागेल तुरुंगाची हवा; जाणून घ्या माहिती
- FasTag Rules 2025 : फास्टॅग नियमांमध्ये झाले मोठे बदल ! वाहतूक कोंडी…
- नवीन सिमकार्ड घेण्यासाठी करावे लागणार आता ‘हे’ काम! पीएमओने दूरसंचार विभागाला जारी केल्या सूचना