‘ह्या’ तालुक्यात नगरसेविकेसह सरकारी डॉक्टर कोरोना बाधित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत.

तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 125 वर जाऊन पोहोचली आहे. नवीन आलेल्या अहवालानुसार नेवासा नगरपंचायतीच्या एक नगरसेविका व एक सरकारी डॉक्टर यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

बाधित नगरसेविकेच्या घरातीलच काही व्यक्तींची रॅपीड अँन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली त्यामध्ये 3 व्यक्ती कोरोना बाधित

आढळून आले आहेत. तसेच तालुक्यातील एक शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यास देखील कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

 

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe