रोहित पवार म्हणतात, ‘ते’च शिवसेनेत नाही आले म्हणजे झालं !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलच फटकारलं आहे. सत्तेसाठी त्यांनी पक्ष नाही सोडला म्हणजे झालं अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

त्याच झालं असं, प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत जायला तयार असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केला होते.

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चंद्रकांत पाटील यांचे विधान खोडून काढत शिवसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले होते.

हाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते आ.रोहित पवार यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. भाजपची सत्तेत येण्याची घाई पाहता किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश करू नये,

म्हणजे झालं, अशा शब्दात आ.पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा उपरोधिक समाचार घेतला आहे. ‘आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपतील एक मोठे नेते म्हणाले.

सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता 5 वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!’ असं ट्विट आ.पवार यांनी केले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe