अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-नगर-पुणे रोडचा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी महत्वाचा असलेला उड्डाणपुलाच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.
खासदार व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपुरावामुळे हे काम सुरु झाले असून हा उड्डाणपूल वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला.
नगर-पुणे रोडवर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूपृष्टीय तपासणी कामाचा प्रारंभ सक्कर चौकात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते झाला.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता प्रफुल दिवाण, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, सहाय्यक अभियंता दिग्विजय पाटणकर, मुजीब सय्यद, श्रीकांत लोखंडे आदि उपस्थित होते.
अधीक्षक अभियंता प्रफुल दिवाण म्हणाले, उड्डाणपुलाच्या कामासाठी भूपृष्टीय तपासणी होणे आवश्यक असल्याने या कामाचा प्रारंभ आज झाला आहे.
जमिनी खाली कोणत्या प्रकारचा खडक आहे, किती मुरूम आहे हे ड्रिल करून तापसणी करत आहे. साधारपणे ९६ ते १०० खांब पुलासाठी उभारण्यात येणार आहे.
या प्रत्येक खांबांच्या खालच्या खडकाची तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी साधारण एक महिना लागणार आहे. त्यानंतर खांबांची डिझाईन तयार होऊन पुलाच्या पायाभरणी कामास सुरवात होईल. त्यानंतर पुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरवात होईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा