राखी बाबत अत्यंत महत्वाची बातमी वाचा इथे क्लिक करून

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-यावर्षी दि. 3 ऑगस्ट रोजी रक्षा बंधन हा सण आहे . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय डाक विभागाने राखी पोस्टाने पाठविण्यासाठी विशेष योजना आखली आहे.

या अंतर्गत राखी पाठविण्यासाठी डाक विभागाने विशेष अश्या पाकिटाची व्यवस्था केलेली आहे. हे पाकीट अत्यंत आकर्षक व टिकाऊ असून वाटरप्रुफ आहे. त्यामुळे या पाकिटातून अत्यंत सुरक्षितरित्या राखी पाठविला येते.

अहमदनगर विभागातील सर्व डाकघरामध्ये या पाकिटांचा पुरेसा पुरवठा केला असून त्यामार्फत नागरिकांना राखी पाठविता येईल.

रक्षा बंधन म्हणजेच दि 3 ऑगस्ट पूर्वी सर्व राखी टपाल पोहचविण्यासाठी डाक विभागाने विशेष योजना आखली असून त्यानुसार काम होणार आहे.

राखी अचूक पत्यावर वेळेत पोहचण्यासाठी पाकिटावर नाव , पूर्ण पत्ता, पिन कोड तसेच मोबाईल नंबर लिहावा जेणे करून जलदरीत्या राखीं पोहच करता येईल.

याशिवाय स्पीड पोस्टाने देखील राखी जलदरीत्या पाठविता येईल.कृपया राखी पाकिटामध्ये नाणी अथवा रोख पैसे पाठवू नये.

तरी सर्व नागरिकांनी वेळेत पोस्टामार्फत राखी पाठवून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, अहमदनगर विभाग यांनी केलेले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment