अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- जामखेड येथील ४ कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील ७३ जणांच्या केलेल्या तपासणीत ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे.
शहरात काल दिवसभरात ए काच दिवशी तब्बल १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या तालुक्यातील एकुण संख्या ही १९ झाली आहे.
गेल्या तीन महीन्यांच्या विश्रांती नंतर दि.२९ रोजी दुपारी जामखेड शहरातील एका खाजगी डॉक्टर व बँक मॅनेजरसह एकुण चार जण पॉझिटिव्ह आढळून आले होते.
त्यामुळे शहरात पुन्हा एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाने गंभीर दखल घेत संपर्कात आलेल्या तब्बल ७३ जणांची कोरोना तपासणी केली होती.
या तपासणीत पुन्हा एकच कुटुंबातील सहा तर इतर दोन असे एकुण ८ जण रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर दिवसभरात शहरात एकुण १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत
अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली. तसेच आज दि ३० रोजी सकाळी पुन्हा राळेभात गल्ली येथील महीलेला तर फक्राबाद १व पिंपरखेड येथील तीघाना आणि डोणगाव येथे १ कोरोनाची लागण झाली आहे
त्यामुळे शहरासह तालुक्यातील एकुण संख्या ही १९ झाली आहे. यामुळे जामखेड शहरा सह तालुक्यातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा