कर्जत तालुक्यात गुरुवारी 24 कोरोना बाधित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कर्जत तालुकाही याला अपवाद नाही.लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा फैलाव कर्जत तालुक्यात जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

कर्जत तालुक्यामध्ये गुरुवारी दिवसभरामध्ये 24 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. आता तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 87 वर गेली आहे. तसेच गुरुवारी शहरातील 71 वर्षे वय असलेल्या व्यक्तीचे कोरोनाने निधन झाले.

त्यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या पाच झाली आहे. कर्जत तालुक्यातील कुळधरण व कापरेवाडी नागापूर या तीन गावांमध्ये काल करोनाने शिरकाव केला आहे.

कुळधरण येथे दोन, कापरेवाडी येथे दोन व नागपूर येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये राशीन 14, कर्जत 3, कुळधरण 2, कापरेवाडी 2, पिंपळवाडी 2, नागापूर 1, अशी रुग्णसंख्या आहे.

तालुक्यामध्ये 60 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, अहमदनगरमध्ये ४६१३ एवढे कोरोनाग्रस्त रुग्ण असून १६०४ इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. २९४९ इतके रुग्ण बरे झाले आहेत. ६० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe