श्रीगोंदा :- तालुक्यातील सांगवी दुमाला परिसरात राहणाऱ्या २३ वर्ष वयाच्या तरुणीशी गोड बोलून प्रेमसबंध केले. तू माझ्याशी लग्न केले नाहीतर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करुन घेवून तुझ्या कुटुंबाचे नावे चिठ्ठीत लिहून ठेवील, असे धमकावून आरोपी लखनकुमार काकडे, रा. सांगवी दुमाला याने इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरदस्तीचे शरीरसंबंध करुन बलात्कार केला.
इतर आरोपींनी त्याला मदत केली.आरोपींनी संगनमत करुन तरुणीला वीष पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. व जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली.
याप्रकरणी काल पिडीत तरुणीने श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दिल्यावरुन आरोपी लखन कुमार काकडे, लक्ष्मण अण्णा नलगे, सुधीर नलगे, भाऊ नलगे, कुमार काकडे, शुभांगी नलगे, स्नेहल काकडे, भोसले, सर्व रा. सांगवी दुमाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थाटच न्यारा असा आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचा नजारा
- अहिल्यानगर शिवसेनेत राजकीय भूकंप ! उरलेसुरले प्रमुख पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत दाखल
- सॅमसंगच्या ‘या’ 3 स्मार्टफोनवर मिळत आहे भन्नाट सुट! पटापट चेक करा यादी
- सीडीएसएल शेअर्समधील घसरण कायम ! शेअर होल्ड करावा की सेल ? एकस्पर्ट्स म्हणतायेत….
- क्रिप्टो मार्केटमध्ये लवकरच जिओ कॉईनची एन्ट्री ! एन्ट्रीआधी ‘या’ ठिकाणी मोफत मिळतायेत जिओ कॉइन, श्रीमंत होण्याची संधी