अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- आज अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात रोहित पवार यांनी भेट देत कोरोनाच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर वक्तव्य केले. यावेळी त्यांनी खा.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला.
खा. सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होते
‘अहमदनगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे रोज भूमिपूजन व उद्घाटन करून गर्दी गोळा करीत आहेत. त्यांनी ते आधी थांबवावे मग भाजपला सल्ला द्यावा.’
हाच धागा पकडून रोहित पवार यांनी खा.सुजय विखेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘दिल्लीच्या प्रमुख नेत्यांना चांगले वाटावे यासाठी ते तसे बोलले असतील.
मुळात शरद पवार यांनी भूमिपूजन बाबत जे वक्तव्य केले होते, त्याला कारणे वेगळी होती. भूमिपूजनासाठी अयोध्येत गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आणि ही गर्दी कोरोनाच्या काळात घातक होऊ शकते. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा