अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंध कायम असतील,
असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारी सांगितले. थिएटर, जीम, क्रीडा संकुले, जलतरण, मनोरंजन पार्क, नाट्यगृहे, बार, प्रार्थनागृहे बंद राहतील.

सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी एकत्र येण्यास मनाई आहे. धार्मिक स्थळे बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ७ ते पहाटे ५ यावेळेत नागरिकांच्या फिरण्यावर निर्बंध राहतील.
५ ऑगस्टपासून मॉल्स, बाजार संकुले ठरवून दिलेल्या वेळेत खुले राहतील. बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खुली राहतील.
मॉल आणि बाजारसंकुले ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत खुली राहतील, अशी माहिती शुक्रवारी पत्रकाद्वारे देण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा