अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- डम्पर अडविल्याचे गैरसमजातून एका ४१ वर्षीय इसमाचे अपहरण करून जबर मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
यांच्यावर भादवि कलम 326, 329, 365, 324, 323, 504, 506, 34 व आर्म अॅक्ट 3 व 25 प्रमाणे 272/2020 क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की; जखमी संतोष पोपट बारहाते (वय 41) याने दिलेल्या जबाबात म्हटले की, 24 जुलै रोजी खेडले परमानंद रोडवर असणार्या
एका दवाखान्यासमोर फोनवर बोलत उभा असताना सोनई गावातून एका कार मधून तिघे आले. त्यातील राहुल पद्माकर दरंदले हा तरुण माझ्याकडे आला व माझ्या डोक्याला गावठी कट्टा लावून गाडीत बसवून वळण (ता. राहुरी) येथे घेऊन गेले.
कार मुसळवाडी रोडने नेल्यानंतर राहुलने गावठी कट्टा तोंडावर मारून दात पाडला तसेच अनोळखी दोघांनी फाईटने मारले गाडी खाली घेऊन मारहाण केली.
रात्री 2 वाजता माझे घरा समोर आणून टाकले हातातील घड्याळ व खिशातील 30 हजार माझ्याजवळ नव्हते ते त्यांनीच काढून घेतले असावेत असा जबाब त्यांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा