लग्नाचे अमिष दाखवत औरंगाबादच्या विवाहितेवर अत्याचार, श्रीगोंद्यातील तरुणावर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- लग्नाचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथील योगेश शिंदे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडित महिला ही सध्या औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसी परीसरातील बजाजनगर सिडको येथे वास्तव्यास आहे.

योगेश सिद्धेश्वर शिंदे (रा. घारगाव,ता.श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

2017 ते दि. 20 जुलै 2019 दरम्यान नगरमधील तारकपूर, वाळुंज एमआयडीसी, पुणे जिल्ह्यातील शिरूर, वाघोली या भागात विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

योगेश शिंदे याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे पतीपासून तिला पळवून आणले. नगरच्या तारकपूर आणि वाळुंज एमआयडीसी येथे तिला भाडोत्री खोली घेऊन दिली.

या खोलीत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच रांजणगाव, कारेगाव, शिरूर येथील वेगवेगळ्या लॉजवर अत्याचार करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment