अहमदनगर ब्रेकिंग : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-  दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज (1 ऑगस्ट) राज्यभरात गावातील चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांनी आंदोलन केलं.

सकाळी नेवासा बसस्थानकावर भाजपच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या माजी आमदारासह आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आंदोलकांना रास्ता रोको करू नये यासाठी नोटीस बजावली होती. तरी देखील आंदोलनकर्त्यानी आंदोलन केल्याने पोलीस कॉन्स्टेबल प्रतापसिह दहिफळे यांनी

दिलेल्या फिर्यादी वरून भाजपाचे माजी आमदारासह जिल्हा अध्यक्ष गोंदकर, तालुका अध्यक्ष दिनकर, शहर अध्यक्ष पारखे व इतर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दुधाला सरसकट १० रुपये अनुदान द्यावे, प्रती लिटर दुधाला ३० रुपये दर द्यावा व दूध भुकटीसाठी प्रती किलो ५० रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी नेवासा बसस्थानकावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.

दूध दरवाढीच्या मुद्यावरून सरकार विरोधी आंदोलनामध्ये राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप आक्रमकपणे उतरला आहे. राज्यातील अनेक भागात भाजपाच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment