आमदार वैभव पिचड यांचा भाजप प्रवेशाची संबंध नाही !

Published on -

अहमदनगर :- आमदार वैभव पिचड हे भाजप च्या वाटेवर असल्याच्या वृत्ताचे राष्ट्रवादीकडून खंडन करण्यात आले आहे.

आ.पिचड यांच्या समर्थकांनी आमदार पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाहीत, मात्र काही राजकीय कामांच्या व्यतिरिक्त वैयक्तिक कामांसाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क म्हणजे भाजप प्रवेश असा प्रचार म्हणजे राजकीय अफवा आहे.

आमदार पिचड यांच्या मुलीचा सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश यादीत नाव आले आहे. तेथील प्रवेश बदलून तो मुंबई येथील महाविद्यालयात मिळावा,

यासाठी त्यांनी मंत्री विखे, गिरीश महाजन व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याचा भाजप प्रवेशाची संबंध नाही, असा राष्ट्रवादीकडून हवाला दिला आहे.

मुलाखतीस आ.वैभव पिचड गैरहजर !

आ.वैभव पिचड आज अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखातीस गैरहजर होते,दरम्यान भाजप प्रवेशा मुळे कि अन्य इतर कारणामुळे ते गैरसमज राहिले हे अद्याप तरी उघड झालेले नाही.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe