जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री अपयशी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री अपयशी ठरले आहेत, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.

दूध दरवाढ आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून प्रयत्न चालू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार विखे पाटील यांनी दिला. पारनेर तालुक्यात दूध उत्पादकांच्या आंदोलनात ते बोलत होते.

दुधउत्पादक शेतकरांना दुधाला प्रती लीटर ३० रूपये भाव मिळाला पाहिजे, वाढीव आलेली वीज बीले माफ झाली पाहिजेत,

शेतकऱ्यांना खताचा पुरवठा सुरळीत करावा, दुधभुकटीला किमान ५० रूपये प्रतिकिलोचे अनुदान द्यावे, अशी मागणी या वेळी विखे पाटील यांनी केली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment