…अन्यथा अधिवेशनात आवाज उठवू; ‘ह्या’ आमदाराचा इशारा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

त्यामुळे विविध मागण्या घेऊन दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. श्रीगोंदे शहरातील शनी चौकात भाजप व मित्रपक्षांतर्फे आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी आ. पाचपुते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटात जनतेला वाऱ्यावर सोडले अाहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

आघाडी सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे. शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास अधिवेशनात आवाज उठवू, असा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला.

यावेळी नायब तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन देऊन चौकात दूध ओतून न देता वाटप करून सरकारचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या लिंबाला, कांद्याला व इतर पिकांना बाजारभाव मिळत नाही,

तर दुसरीकडे बी-बियाणे, खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्यांच्या किमती अवाच्या सव्वा घेतल्या जातात, याकडे सरकारने दुर्लक्ष केले.

आघाडी सरकार हे शेतकरी विरोधात अाहे, असा आरोप आमदार पाचपुते यांनी केला. यावेळी विक्रमसिंह पाचपुते, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, दादासाहेब ढवाण, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष रायकर आदी उपस्थित होते.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment