सरकारी दवाखान्यात आजारापेक्षा असुविधेचीच रुग्णांना जास्त चिंता

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यापेक्षा अधिक भूकची समस्या जाणवत आहे. सर्वसामान्यांचे रोजगार बुडाले तर काहींच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्या कुटुंबांंपुढे उपासमारीची वेळ आली आहे.

अशा परिस्थितीमध्ये माणुसकी जीवंत ठेवून एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. डॉक्टर कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत आहेत.

मात्र खासगी दवाखान्यात दर निश्चित झाल्यास डॉक्टर व रुग्णांचे नाते चांगले राहणार आहे. सरकारी दवाखान्यात आजारापेक्षा तेथील असुविधेची अधिक चिंता नागरिकांना अधिक वाटते. यात सुधारणा आवश्यक आहे. पैशांअभावी कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये.

हा नागरी हक्क त्यांना मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन स्नेहालय संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी केले. कोरोनाच्या नावाखाली खासगी दवाखान्यात सर्वसामान्य रुग्णांची चालू असलेली आर्थिक लूट व जिल्हा रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता पीपल्स हेल्पलाइन,

भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने रविवारी हुतात्मा स्मारकात महागांधीगिरी क्रांती घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याऐवजी ग्रामसभेच्या माध्यमातून लोकभज्ञाक अष्टप्रधान मंडळ नेमण्याचे प्रस्ताव पूजन करण्यात आले.

त्यावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होते. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे उपस्थित होते. तर वेबीनारद्वारे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून कोरोनाच्या उपचारासाठी नागरिकांना परवडेल, असे दर निश्चित करुन त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

कोरोना महामारीचा फायदा घेऊन अनेक खाजगी हॉस्पिटलनी सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूट सुरु केलेली आहे. या रोगावर उपचार नसतानाही लाखोंच्या घरात बील येत आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड चालू आहे. सरकारने कोरोनाच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयाचे दर निश्चित करुन,

सरकारी रुग्णालयात सोय-सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतमध्ये खाजगी व्यक्ती किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रशासक म्हणून नेमण्याची मंजूरी देण्यात आली. न्यायालयाने खासगी व्यक्ती न नेमता सरकारी व्यक्ती नेमण्याचे आदेश दिले.

कोरोनाचे संकट त्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे शासकीय कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. अशा दुहेरी संकटातून बाहेर पडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अष्टप्रधान मंडळाची गावांना गरज असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment